कॉपीराइट हा YouTube समुदायासाठी महत्त्वाचा विषय आहे. YouTubeवर तुमचे हक्क कसे व्यवस्थापित करावे हे खाली वाचू शकता आणि इतरांच्या हक्कांचा आदर कसा राखावा याबद्दल आणखी जाणून घेऊ शकता.
कॉपीराइटचे उल्लंघन होत असल्याची सूचना YouTubeला देण्याचा सर्वात सोपा पर्याय म्हणजे वेबफॉर्म होय.
तुमचा व्हिडिओ चुकून काढून टाकला आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काउंटर सूचना वेबफॉर्म सबमिट करू शकता.
कॉपीराइट स्ट्राइक आला आहे? तो का आला आणि त्याचे निराकरण कसे करावे हे समजून घ्या.
YouTube ज्या पक्षाने कॉपीराइट रद्द करण्यासाठी मूळ दावा दाखल केला आहे अशा पक्षाच्या विनंतीचा विचार करते.
तुम्ाच्यावर Content ID दावा केला गेल्यास आणि तो चुकीचा अाहे असे वाटत असल्यास तुम्ही त्या दाव्यावर विवाद करू शकता.
तुमची कॉपीराइट आणि सामुदायिक मार्गदर्शक तत्त्वांची स्थिती पहा.
कॉपीराइटमुळे कोणत्या गोष्टींना सुरक्षा मिळते आणि इतर प्रकारच्या बौद्धिक संपदेपेक्षा कॉपीराइट कसे वेगळे आहे ते पहा.
YouTube वर कॉपीराइट-संरक्षित मटेरिअल कसे शोधले जाते आणि तुम्ाच्यावर दावा केला गेल्यास तुम्ही काय करू शकता ते पहा.
आशय मालकांनी YouTube व्हिडिओंमध्ये त्यांचा आशय ओळखण्यासाठी आणि त्यावर दावा करण्यासाठी वापरलेल्या साधनाची व्यवस्थित ओळख करून घ्या.
कॉपीराइट असलेल्या मटेरिअलमधील काही अंश वापरण्याची अनुमती देणारा कायदा आणि अटी वाचा.
आशयाचा पुन्हा वापर करण्याची (विशिष्ट आवश्यकतांसह) अनुमती देणा-या खास प्रकारच्या परवान्याविषयी जाणून घ्या.