धोरणे आणि सुरक्षितता

तुम्ही YouTube वापरता तेव्हा तुम्ही संपूर्ण जगातील लोकांच्या एका समुदायात सामील होता. YouTube वरील प्रत्येक छान, नवीन समुदाय वैशिष्ट्यामध्ये एक प्रकारचा विश्वास असतो. लाखो वापरकर्ते त्या विश्वासाचा आदर करतात आणि तुम्ही देखील कराल याबद्दल आम्हाला विश्वास वाटतो. खालील मार्गदर्शक तत्त्वे फॉलो केल्याने YouTube प्रत्येकासाठी मजेदार आणि आनंददायक होण्यात मदत होते.

YouTube वर तुम्ही पाहत असलेली प्रत्येक गोष्ट कदाचित तुम्हाला आवडणार नाही. आशय अयोग्य आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तो आमच्या YouTube कर्मचाऱ्यांकडे पुनरावलोकनासाठी सबमिट करण्याकरिता ध्वजांकन वैशिष्ट्य वापरा. ध्वजांकित आशय आमच्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी आमचे कर्मचारी दिवसाचे चोवीस तास, आठवड्याचे सातही दिवस त्याचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करत असतात.

तुम्हाला या समस्येपासून दूर राहण्यात मदत करणारे काही मार्गदर्शक सामान्य नियम येथे आहेत. कृपया या नियमांना गांभीर्याने घ्या आणि त्यांचे मनापासून पालन करा. मार्गदर्शक तत्त्वांमधून पळवाट शोधण्याचा प्रयत्न करू नका किंवा तुमच्या पद्धतीने त्यांचा अर्थ लावू नका—फक्त त्यांना समजून घ्या आणि ज्या चांगल्या हेतूने त्यांची निर्मिती करण्यात आली होती त्याचा आदर करा.

नग्नता किंवा लैंगिक आशय

YouTube हे अश्लीलता किंवा भडक लैंगिक आशयासाठी नाही. तुमचा व्हिडिओ अशा प्रकारचा असल्यास, तो तुमचा स्वतःचा व्हिडिओ असला तरीही, तो YouTube वर पोस्ट करू नका. तसेच, हे देखील लक्षात ठेवा की, आम्ही पोलिस खात्यासोबत मिळून काम करतो आणि बाल शोषणाची तक्रार करतो. अधिक जाणून घ्या

हानिकारक किंवा धोकादायक आशय

असे व्हिडिओ पोस्ट करू नका जे इतरांना, विशेषतः लहान मुलांना इजा पोहोचू शकेल अशा गोष्टी करण्यास प्रोत्साहित करतील. अशी हानीकारक किंवा धोकादायक कृत्ये दाखवणारे व्हिडिओ त्यांच्या तीव्रतेनुसार विशिष्ट वयोगटापुरता मर्यादित ठेवण्यात येतील किंवा काढून टाकले जाऊ शकतील. अधिक जाणून घ्या

द्वेषपूर्ण आशय

आमची उत्पादने ही मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी दिलेली व्यासपीठे आहेत. परंतु आम्ही वंश किंवा जातीचा उद्भव, धर्म, अपंगत्व, लिंग, वय, राष्ट्रीयत्व, ज्येष्ठत्व किंवा लैंगिक प्रवृत्ती/लिंग ओळख यांच्या आधारावर एखाद्या व्यक्तीच्या किंवा गटाच्या विरोधातील हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या किंवा त्यांच्यावरील हिंसेचे समर्थन करणाऱ्या किंवा या प्रमुख वैशिष्ट्यांच्या आधारावर तिरस्कार वाढवण्याचा प्राथमिक उद्देश असलेल्या अाशयास सपोर्ट करत नाही. हे नीट उलगडून सांगणे कठीण आहे; पण एखाद्या अाशयाचा मुख्य उद्देश संरक्षित गटावर हल्ला करण्याचा असल्यास, तो आशय त्याची मर्यादा ओलांडतो आहे असे समजावे. अधिक जाणून घ्या

हिंसक किंवा ग्राफिक आशय

ज्याचा मुख्य उद्देश धक्कादायक, सनसनाटी किंवा अपमानास्पद अाहे असा हिंसक किंवा रक्तरंजित आशय पोस्ट करणे चांगले नाही. एखादी बातमी किंवा माहितीपटाच्या संदर्भात असा ग्राफिक आशय पोस्ट केला असल्यास, कृपया व्हिडिओमध्ये काय चालले आहे हे लोकांना समजावे यासाठी पुरेशी माहिती देण्याकडे लक्ष द्या. इतरांना विशिष्ट हिंसक कृत्ये करण्यासाठी प्रोत्साहित करू नका. अधिक जाणून घ्या

त्रास देणे आणि सायबर छळवणूक

YouTube वर अपमानास्पद व्हिडिओ पोस्ट करणे ठीक नाही. छळवणूकीची परिणती दुर्भावनापूर्ण हल्ल्यामध्ये होत असेल तर त्याची तक्रार नोंदवली जाऊ शकते. असे केल्याने तो व्हिडीओ कदाचित काढलाही जाईल. इतर प्रकरणांमध्ये, वापरकर्त्यांकडून अगदी सौम्य किंवा क्षुल्लक प्रमाणात त्रास होऊ शकतो आणि त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. अधिक जाणून घ्या

स्पॅम, दिशाभूल करणारा मेटाडेटा आणि घोटाळे

स्पॅम कुणालाही आवडत नाही. व्ह्यू वाढवण्यासाठी दिशाभूल करणारी वर्णने, टॅग, शीर्षके किंवा थंबनेल तयार करू नका. टिप्पण्या आणि खाजगी संदेश यांच्याखेरिज, अलक्ष्यीकृत, गरज नसलेला किंवा पुनरावृत्ती झालेला आशय पोस्ट करणे चांगले नाही. अधिक जाणून घ्या

धमक्या

लबाडी, पाळत ठेवणे, धमकावणे, छळणे, दहशत पसरवणे, खाजगीपणावर आक्रमण, इतर लोकांची वैयक्तिक माहिती उघड करणे आणि इतरांना हिंसक कामे करण्यासाठी किंवा वापर अटींचे उल्लंघन करण्यासाठी चिथावणे, या गोष्टींचा अत्यंत गांभीर्याने विचार केला जाईल. कोणालाही असे करताना पकडल्यास त्यांना YouTube वरून कायमचे प्रतिबंधित केले जाऊ शकते. अधिक जाणून घ्या

कॉपीराइट

कॉपीराइटचा आदर करा. केवळ तुम्ही तयार केलेले किंवा तुमच्या वापरासाठी अधिकृत असलेले व्हिडिओ अपलोड करा. याचाच अर्थ, तुम्ही तयार न केलेले व्हिडिओ अपलोड करू नका किंवा संगीत ट्रॅक, कॉपीराइट असलेल्या कार्यक्रमांच्या झलकी अथवा अन्य वापरकर्त्यांनी तयार केलेले व्हिडिओ असा कुणा अन्य व्यक्तीचे कॉपीराइट असलेला आशय, आवश्यक ऑथोरायझेशनशिवाय तुमच्या व्हिडिओमध्ये वापरू नका. अधिक माहितीसाठी आमच्या कॉपीराइट केंद्राला भेट द्या. अधिक जाणून घ्या

गोपनीयता

कुणीतरी तुमची वैयक्तिक माहिती पोस्ट केली किंवा तुमच्या संमतीशिवाय तुमचा एखादा व्हिडिओ अपलोड केला असल्यास तुम्ही आमच्या गोपनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे आशय काढून टाकण्याची विनंती करू शकता. अधिक जाणून घ्या

तोतयागिरी

दुसऱ्या चॅनेलची किंवा व्यक्तीची तोतयागिरी करण्यासाठी तयार केलेली खाती आमच्या तोतयागिरी धोरणाचे अंतर्गत काढली जाऊ शकतात. अधिक जाणून घ्या

मुले धोक्यात सापडण्‍याची स्‍थिती

तुम्हाला अनुचित आशय आढळल्यास काय करावे ते जाणून घ्या. तसेच, हे देखील लक्षात ठेवा की, आम्ही पोलिस खात्यासोबत मिळून काम करतो आणि बाल शोषणाची तक्रार नोंदवतो अधिक जाणून घ्या

अतिरिक्त धोरणे

अनेक विषयांवरील अतिरिक्त धोरणे. अधिक जाणून घ्या

तुमची सुरक्षितता आमच्यासाठी महत्त्वाची आहे. YouTube टूल आणि संसाधनांबद्दल अधिक जाणून घ्या आणि खालील बऱ्याच विषयांवर टिपा मिळवा.

किशोरवयीनांची सुरक्षितता

येथे YouTube वर सुरक्षित राहण्यात मदत करणारी काही उपयुक्त साधने आणि टिपा आहेत. अधिक जाणून घ्या

प्रतिबंधित मोड

तुम्‍हाला किंवा तुमच्‍या कुटुंबाला पाहायचा नाही असा आक्षेपार्ह वाटणारा आशय वगळा. अधिक जाणून घ्या

आत्महत्या आणि स्वयं इजा

तुम्‍ही एकटे नाही. मदत हवी आहे का? अमेरिकेमध्‍ये विनामूल्‍य, गोपनीय 24/7 मदत मिळवण्यासाठी, राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध लाइफलाइनवर कॉल करा: 1-800-273-8255. अधिक जाणून घ्या

शिक्षक संसाधने

येथे ऑनलाइन सुरक्षेसाठी तुम्‍हाला आणि तुमच्‍या विद्यार्थ्‍यांना सक्षम करण्‍यात मदत करण्‍ाारी काही संसाधने आहेत. अधिक जाणून घ्या

पालक संसाधने

तुमच्या कुटुंबाचा YouTube वरील अनुभव व्‍यवस्‍थापित करण्‍यात मदत करणारी साधने आणि संसाधने. अधिक जाणून घ्या

अतिरिक्त संसाधने

YouTube वापरकर्त्‍यांसाठी अधिक उपयुक्‍त माहिती आणि संसाधने. अधिक जाणून घ्या

गोपनीयता आणि सुरक्षितता सेटिंग्ज

गोपनीयता आणि सुरक्षितता सेटिंग्‍जवर त्‍वरित अॅक्‍सेस. अधिक जाणून घ्या

कायदेशीर धोरणे

आमची व्हिडिओ काढण्याची कायदेशीर धोरणे आणि तक्रारी सादर करण्याची प्रक्रिया यावरील माहिती. अधिक जाणून घ्या

YouTube वर आशयाची तक्रार कशी नोंदवावी आणि आम्ही आमच्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी कशी करतो याबद्दल जाणून घ्या.

व्हिडिओची तक्रार करा

आशय कधी, का आणि कसा फ्लॅग करायचा. अधिक जाणून घ्या

गैरवापर करणाऱ्या वापरकर्त्याची तक्रार करा

येथे अहवाल थेट फाइल करा. अधिक जाणून घ्या

कायदेशीर तक्रार करा

येथे अहवाल थेट फाइल करा. अधिक जाणून घ्या

गोपनीयता उल्लंघनाची तक्रार करा

साइटवरील व्हिडिओ किंवा टिप्‍पण्‍या तुमची गोपनीयता किंवा सुरक्षिततेचे उल्‍लंघन करत असल्‍यास आम्‍हाला कळवा. अधिक जाणून घ्या

अन्य अहवाल पर्याय

जेव्हा व्हिडिओ फ्लॅग केल्‍यावरही तुमची समस्‍या योग्‍यरित्‍या कॅप्‍चर होत नाही. अधिक जाणून घ्या

वयोमर्यादा

काही वेळा एखादा व्हिडिओ आमच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत नाही, परंतु प्रत्येकासाठी योग्य असेल असेही नाही; म्हणून वयोमर्यादा ठरवून दिलेली असू शकते. अधिक जाणून घ्या

सामुदायिक मार्गदर्शक तत्त्वे स्ट्राइक

ते काय आहेत आणि आम्‍ही त्‍यांना कसे हाताळतो. अधिक जाणून घ्या

खाते समाप्त करणे

गंभीर स्वरुपाची किंवा वारंवार होणारी उल्लंघने समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यास खाते समाप्त होऊ शकते अधिक जाणून घ्या

व्हिडिओ स्ट्राइकसाठी अपील करा

तुम्‍हाला स्‍ट्राइक मिळाल्‍यास काय करायचे. अधिक जाणून घ्या